Tricks and Tips

ई-लार्निग (के-क्लास)

K-Class(जि.प.प्रा.शा.किनगाव ता.अंबड जि.जालना)

             आज शैक्षणिक विकासासाठी सर्वञ वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात- आता कायदयाने  6 ते 14 वयोगटातील मुलांचा शिक्षण हा हक्क झाला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक मुल शाळेत आले पाहिजे. तरीही आज अनेक ठिकाणी शालाबाहय मुले पाहायला मिळतात.अशा मुलांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी  व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आज विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आमच्या शाळेनेही गावातील प्रत्येक मुलाने म्हटले पाहिजे की,
             " हि मज आवडते मनापासुनी शाळा,
                जशी लळा लाविते माऊली बाळा "
      त्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व पालक यांच्या चर्चेतून माहिती तंञज्ञानाच्या युगात माहिती तंञज्ञानाचा वापर आपण अध्ययन - अध्यापनात करायचा जेणे करुन विदयार्थ्यास माहिती तंञज्ञानाची ओळख होईल. त्याच बरोबर यामधून विदयार्थ्यांची अनुपस्थिती, गळतीचे प्रमाण या समस्या सुटतील त्याचबरोबर  या तंञज्ञानाने विदयार्थ्यांचे अमूर्त संबोध स्पष्ट होतील, अध्ययन अध्यापन मनोरंजक, कृतिशील ,विदयार्थ्यांचे  अवधान खेचून घेणारे , विदयार्थ्यांची आकलन क्षमता वाढवणारे होईल. एकंदरीत यातून विदयार्थ्यांस गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यासाठी आय.आय.टी. मुंबईने विकसित केलेले K-yan वापरण्याचे ठरवण्यात आले.



           K-yan म्हणजेच यामध्ये प्रोजेक्टर , संगणक, लेझर किरणांच्या मदतीने चालणारा इन्फ्रा रेड पेन, वायरलेस की-बोडे, माऊस, स्पिकर या सर्वाचा एकञित समावेश . हे सर्व तुम्ही तुमच्या सोबत कोठेही घेवून जाऊ शकता. याचा वापर तुम्ही प्रकाशामध्ये तसेच अंधा-या खोली मध्ये ही करु शकता. 

Interactive white board -

            यामध्ये तुम्ही इन्फ्रा रेड  पेनच्या मदतीने Interactive white board वर लिहू शकता. लिहित असताना तुम्हाला पाहिजे असलेल्या कोणत्याही रंगाचा वापर तुम्ही अगदी सहजपणे करु शकता. तसेच लिहित असताना तुमच्या अक्षराचा आकारही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निवडू शकता. 

              तसेच यावरही वेगवेगळया रंगसंगतीचा वापर करुन आकृत्या , विविध तक्ते, चिञ काढू शकता.लिहिलेला मजकूर तुम्हाला Highlight ही करता येतो.


          तसेच संपूर्ण White board  वर  मजकूर लिहिण्यासाठी जागा कमी पडत असेल तर Move content च्या मदतीने तुम्ही संपूर्ण White board move करु शकता. White board वरील जो मजकूर नको आहे, असा मजकूर तुम्ही Delete करु शकता किंवा संपूर्ण मजकूर एकदाच Delete  करु शकता. तुम्ही अध्यापन करताना चार बोर्ड वर लेखन केलेले असेल तर ते सर्व बोर्ड एकाच वेळी तुम्हांला विदयार्थ्यां समोर दाखवता येतील.

           तसेच तुम्ही वेगवेगळया आकृत्या, नकाशे,चिञे स्कॅन करुन यामधील Picture चा वापर करुन दाखवू शकता . याठिकाणी तुम्ही Zoom ही करता येतात. तसेच आकृतीचा ञिमितीय आकारही याठिकाणी  तुम्हाला दाखवता येतो.
             White board च्या सारखाच यामध्ये Green board ही आहे. याचाही वापर अध्यापनात करता येतो.


Four Line Board -
               आज इयत्ता पहिली पासूनच  विदयार्थी इंग्रजीचा अभ्यास करत आहेत. इंग्रजीतील Capital letters - Small letters यांचे लेखन कशाप्रकारे करावे ? यासाठी हा Four Line Board अतिशय उपयुक्त ठरतो. तसेच विदयार्थ्याना ही Four Line मध्ये alphabets लेखनाचा सराव याठिकाणी उत्तम प्रकारे देता येतो.
            

               विदयार्थ्यांच्या अध्ययनाला तंञज्ञानाची जोड दिल्याने त्यांचे अवधान यामधून टिकवून ठेवता येते. यातूनच त्यांची अध्ययनासाठी रुची निर्माण होते. तसेच याठिकाणी त्याला कृतीलाही संधी मिळते . विदयार्थ्यांच्या कृतिशीलते त्यांनी केलेली कृती त्यांच्या चिरकाल स्मरणात राहण्यास मदत होते. एकंदरीत विदयार्थ्यांस कमी कालावधीत इंग्रजी शिकण्यास , त्याप्रती रुची वाढण्यास, हस्ताक्षर सुधारण्यास , हसत-खेळत, मनोरंजनातून कृतियुक्त शिक्षण यासारखे विविध हेतू यातून साध्य होण्यास मदत होते.
Box Board -
             सर्वसाधारणपणे विदयार्थ्यांची लहानपणा पासूनच गणिताशी मैञी होणे गरजेचे असते.जर त्यांची गणिताशी लहानपणी मैञी झाली तर त्याचा गणित हा विषय आवडीचा बनतो . तसेच गणिती क्रियेमुळे  त्यांच्या विविध गुणांचा विकास होत असतो. या गुणांच्या विकासासाठी विदयार्थ्यांना पहिली पासूनच हा Box Board मदत करतो.

          यामध्ये विदयार्थ्यांचे आपण विविध खेळ घेवू शकतो.तसेच यावर विदयार्थ्यांना क्रमवार अंक लिहिणे , त्यांच्यातील फरक, अंकांची आकर्षक रचना, विविध रंगसंगती, पाढे, विविध गणिती क्रिया विदयार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून आपण याठिकाणी घेवू शकतो. त्यामुळे ते चांगल्याप्रकारे गणिती कौशल्य आत्मसात  करु शकतात.

Graph Board -
             इयत्ता पाचवी, सहावी, सातवीच्या विदयार्थ्यांना आलेखाची ओळख, त्यावरील अक्ष, प्रमाण, आलेखाचे प्रकार या सर्व गोष्टी विविध रंगाचा वापर करुन विदयार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेवून त्यांना आलेख याद्वारे आपण शिकवू  शकतो. 

               त्यामधील रंगसंगतीमुळे आलेख आकर्षक दिसतात. त्यामुळे विदयार्थ्यांचे अवधान खेचून घेण्यास व टिकवून ठेवण्यास मदत होते.

Music Board -
                 त्याचप्रमाणे यामध्ये  संगीत विषयासाठी ही बोर्ड आहे. ते ही तुम्ही  याद्वारे शिकवू शकता.

                त्याचबरोबर तुमच्या संगणकातील अध्ययन घटकाशी संबंधित चिञ , व्हिडीओ हे ही याठिकाणी घेवू शकता. तुम्ही शिकवित असलेला घटक तुम्हाला जर जतन करुन ठेवायचा असेल तर वेब    कॅमे-याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण तासिका record करुन जतन करु शकता.पाठयघटकाशी संबंधित माहिती इंटरनेटच्या मदतीने तुम्ही विदयार्थ्यां समोर दाखवू शकता. तसेच दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमही दाखविण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. या सर्वांचा अध्ययन-अध्यापनात वापर झाल्यावर अध्यापन निश्चितच प्रभावी, दर्जेदार व आनंददायी होईल.

K-Class -
               यामध्ये  इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंतचा अतिशय उच्च दर्जाचा , विदयार्थ्याना कृतिशील ठेवणारा असा अभ्यासक्रम आहे. यामध्ये विविध पाठ जीवंत करुन दाखवले आहे. 

             मराठी विषयाचा विचार केला तर  त्यामध्ये प्रत्येक पाठासाठी-कवितेसाठी समर्पक अशी प्रस्तावना, कवितेचा भावार्थ , कवितेची चाल , विदयार्थ्यांना कृतिशील ठेवण्यासाठी स्वाध्याय अशाप्रकारे प्रत्येक पाठ - कविता सोपी करण्यात आली आहे.

             गणित विषयाचे अध्ययन करताना विदयार्थ्यांना गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार, अपूर्णांक हे संबोध चांगल्याप्रकारे स्पष्ट करुन सांगण्यात आलेले आहेत.

            तसेच प्रत्येक घटका नंतर विदयार्थ्यांना कृतिशील ठेवण्यासाठी काही स्वाध्याय देखील दिलेले आहेत.याठिकाणी विदयार्थ्यांनी स्वत:कृती करुन दिलेला स्वाध्याय सोडविल्यानंतर विदयार्थ्यांचे उत्तर चूक की बरोबर हे ही या ठिकाणी काही क्षणात दाखविले जाते. बरोबर उत्तर काय आहे हे ही दाखविण्याची व्यवस्था यामध्ये आहे.

             इंग्रजी सारखा विषय ही अतिशय सोपा करुन दाखविला आहे.

           यामध्ये विदयार्थ्यांना श्रवणाची चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. तसेच सर्वांसमोर वाचन ,लेखन याचाही सराव याठिकाणी घेता येतो. 


            इतिहासातील    घटनाही   अतिशय रंजकपणे  यामध्ये दाखविण्यात आलेल्या आहेत. त्या घटना पाहून विदयार्थ्यांच्या चांगल्या स्मरणात राहतात.

                  भूगोलमधील नकाशे पाहताच विदयार्थ्यांना प्रत्येक राज्याच्या,देशाच्या सीमांची माहिती चांगल्या प्रकारे होते.

               विविध संकल्पना ग्रह, त्यांचा रंग,आकार, त्यांचे परिभ्रमण, परिवलन, पृथ्वीगोल, अक्षवृत्त, रेखावृत्त या सर्व संकल्पना पाहता क्षणीच त्यांच्या स्पष्ट होतात.

             या दृक् श्राव्य्‍ा साधनामुळे विदयार्थ्यांचे विविध घटक चिरकाल लक्षात राहतात.
                
   
          या तंञज्ञानाचा वापर आम्ही शाळेत केल्याने , विदयार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून झालेली आहे. या तंञज्ञानाच्या   जोडीने ग्रामीण भागातील विदयार्थी ही योग्य प्रकारे हे तंञज्ञान स्वत: च्या हाताने  हाताळत आहेत. हे तंञज्ञान हाताळता-हाताळता स्वत:लाही उज्ज्वल भवितव्याकडे घेवून जात आहेत.

                                                                                शब्दांकन
                                                                         श्री धुमाळ डी.एस.
                                                                                    स.शि.

No comments:

Post a Comment